मुदतवाढ – इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ ऑनलाईन आवेदनपत्र


मुदतवाढ – इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ ऑनलाईन आवेदनपत्र

Scholarship Form

        पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ च्या परीक्षेचो अधिसूचना परीक्षा परिषदेच्या  संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेचे नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक ०१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर, २०२१ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती.

तथापि शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक १५ जानेवारी २०२२ ते ३1 जानेवारी २०२२ या कालावधीत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दिनांक ३1 जानेवारी, २०२२ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी. दि. ३१ जानेवारी, २०२२ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र किंवा शुल्क भरता येणार नाही, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

Scholarship Exam 2022

     आवेदनपत्र भरणेसाठी मुदतवाढ दिल्याने दि. २०/०२/२०२२ रोजी होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होत नसल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलणे क्रमप्राप्त आहे. सबब परीक्षेची सुधारित तारीख यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

आवेदन भरण्यासाठी येथे क्लिक करा.

School Registration

Click Here

SCHOOL LOGIN

Click Here

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी

Click Here

5th and 8th Scholarship


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!