पाचवी ते आठवी विषयनिहाय वर्णनात्मक नोंदी | 5th to 8th All Subject Varnanatmak Nondi

HomeUncategorized

पाचवी ते आठवी विषयनिहाय वर्णनात्मक नोंदी | 5th to 8th All Subject Varnanatmak Nondi

पाचवी ते आठवी विषयनिहाय वर्णनात्मक नोंदी विद्यार्थ्यांचे 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन' करणे या संकल्पनेचा शब्दश: अर्थ मुलांचे सतत व सर्व अंगाने ह

इयत्ता – सहावी, अकरावा दिवस – सेतू अभ्यास | Class – Sixth, Eleventh Day – Bridge Course
सेतू अभ्यास २०२२-२३ ची उत्तर चाचणी | Post Test of Bridge Course 2022-23
सेतू अभ्यास | इयत्ता – दहावी | 21 वा दिवस | Bridge Course | Class – Tenth | 21st Day 

पाचवी ते आठवी विषयनिहाय वर्णनात्मक नोंदी

5th to 8th Varnanaatmak nondi

विद्यार्थ्यांचे ‘सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन’ करणे या संकल्पनेचा शब्दश: अर्थ मुलांचे सतत व सर्व अंगाने होणारे मूल्यमापन. यात प्रामुख्याने दोन घटकांचा समावेश करण्यात आला आहे- आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन.

वर्णनात्मक नोंदी इयत्ता – पाचवी ते आठवी विषयनिहाय नोंदी

यात सातत्यपूर्ण आकारिक मूल्यमापन करावे लागते. अभ्यासक्रमात दिलेल्या निकषांनुसार विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते किंवा नाही, याची नियमितपणे पडताळणी करणारे मूल्यमापन, वर्षभर अध्ययन-अध्यापनप्रक्रिया सुरू असतांना केले जाणारे मूल्यमापन, अध्ययनातील प्रत्येक उद्दिष्ट साध्य करण्यापूर्वीच्या प्रक्रियेची पडताळणी करणारे मूल्यमापन इत्यादी आकारिक मूल्यमापन होय. विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व आकार घेत आसतना नियमितपणे करावयाचे मूल्यमापन. यात खालील साधन तंत्रांचा वापर केला जातो.

  1. दैनंदिन निरीक्षण
  2. तोंडीकाम ( प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन, भाषण संभाषण, गटचर्चा, मुलाखत इत्यादी. )
  3. प्रात्यक्षिक / प्रयोग
  4. उपक्रम / कृती
  5. प्रकल्प
  6. चाचणी
  7. स्वाध्याय
  8. इतर : ( प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयं मूल्यमापन, गटकार्य इ. )

या मूल्यमापनप्रक्रियेसाठी दैनंदिन निरीक्षण, स्वाध्याय (कथा, निबंध, अहवाल, वर्ण, पत्र, संवाद, एखाद्या विषयाची माहिती इत्यादींचे लेखन करणे.), तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक कार्ये, कृतियुक्त कार्ये, प्रयोगात्मक कार्ये, प्रकल्प, प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन, चाचणी (कोणत्याही वेळापत्रकाशिवाय आणि कोणतीही पूर्व कल्पना न देता अल्प कालावधीत घेण्यात येणारी अनौपचारिक स्वरूपाची लेखी चाचणी), स्वयं-अध्ययनाद्वारे वैयक्तिक व गटांत शैक्षणिक उपक्रम राबविणे इत्यादी साधन-तंत्रांचा वापर करावा लागतो.

अ.क्र. विषय बटनावर click करा.
1 पाचवी
2 सहावी
3 सातवी
4 आठवी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0

You cannot copy content of this page